‘पश्‍चिम रंग’ कला महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
90

कला अकादमी आयोजित ‘पश्‍चिम रंग’ या पाश्‍चात्त्य शास्त्रीय संगीत महोत्सवाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कला अकादमी गोवाचे उपाध्यक्ष सुशांत खेडेकर, जर्मनी म्युझिक कौन्सिलचे सरसंचालक बेंडीक्ट हर्टमन, कला अकादमीचे सदस्य सचिव प्रसाद लोलयेकर यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी हर्टमन यांनी मनोगतात या कला महोत्सवाच्या निमित्ताने जर्मनी व भारतातील कलाकार एकत्र येत असल्याबद्दलचा आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, प्रत्येकाच्या ह्रदयातील संगीताला आपण खुले केले पाहिजे. तर खेडेकर यांनी पाश्‍चात्त्य संगीताचा गोव्याच्या संगीतावर असलेला प्रभाव याकडे निर्देश करून हा महोत्सव कला अकादमीत होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शनिवार दि. १७ व रविवार दि. १८ असे दोन दिवस हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. रविवारी संध्याकाळी या महोत्सवासा समारोप करण्यात आला. या दोन दिवसांच्या महोत्सवात १९ ते २३ वयोगटातील एकूण १०६ कलाकार सहभागी झाले होते. व्हायोलीन, पियानो वादनाने रसिक भारावून गेले. मैथिली ठाकूर व सोङ्गिया यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.