>>२५ जखमी बसची दोन गाड्यांना ठोकर
ुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर पनवेलनजीक काल पहाटे बस-कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात १८७जण ठार व २५ जण जखमी झाले. एक खासगी बस व दोन कारगाड्यांमधील टक्करीत तिन्ही वाहने २० फूट खोल कोसळून हा अपघात घडला.
मृतांमध्ये ७ महिला, तीन पुरुष व बालकांचा समावेश आहे. याबाबत वृत्त असे की एका खाजगी कंपनीची बस सातार्याहून मुंबईकडे येत होती. यावेळी पनवेल येथील शेडुंग गावाजवळील रस्त्याच्या बाजूस इनोव्हा व स्वफ्ट अशा दोन गाड्या उभ्या होत्या. त्यापैकी इनोव्हा गाडी नादुरुस्त झाली होती व त्यातील लोकांच्या मदतीसाठी स्वीफ्ट गाडी थांबली होती. त्याचवेळी त्या गाड्यांमागून सातार्याहून मुंबईला जाणारी सदर बस या दोन्ही गाड्यांवर प्रचंड वेगाने धडकली. जबरदस्त धडकीमुळे दोन्ही गाड्या खोलगट भागात भिरकावल्या गेल्या आणि बसचालकाचे नियंत्रण गेल्यामुळे बसही खोलगट भागात कोसळली.
या अपघातात ११ जण जागीच ठार झाले. नंतर ही संख्या १७वर गेली. अपघातात जखमी झालेल्या २५ जणांवर पनवेलमधील इस्पितळांमध्ये अपचार सुरू असल्याचे सांगण्यातम आले. जखमींपैकी बर्याच जणांची स्थिती गंभीर आहे.
अपघातातील मृत, जखमींची नावे
या अपघातात मरण पावलेल्या तिघांचीच ओळख पटली असून त्यांची नावे अशी श्रध्दा काळे (२०), वेदिका यादव (०२), अविनाश कारंडे (३९).
जखमी व्यक्ती- प्रवीण खोपडे (भांडूप), जगन्नाथ दळवी (अंधेरी), सुनिता डिगे (सातारा), रितेश चव्हाण (जोगेश्वरी), नीलेश नाळे (ठाणे), निशा यादव (सातारा), सागर पाटील (घणसोली), सिध्देश कदम (ठाणे), राज अपनाथ (ठाणे), ओमकार मानगोळी (ठाणे), ओमकार साळुंखे (लोणंदा), अनिता निकम (सातारा), मनोहर बुजाहर (सातारा), योगेश खराडे (डोंबिवली), अक्षय गुजर (सातारा), श्रुती शिवांतक (सातारा), सुनील गोडसे (दिवा), आर्या बहादपुरे (ठाणे), निर्मई भोईटे (कल्याण), प्रकाश गायकवाड (कळवा), आश्विनी भोईटे (कल्याण), सुषमा शिवजकर (सातारा), संगीता गोडसे (दिवा), संदेश गोडसे (दिवा), लता काळे (कांदिवली).