होडी उलटून एक बुडाला

0
75

कुंडईमानस येथे काल पहाटे ५.४५ दरम्यान, होडी उलटल्याने एकजण बुडाला तर दुसरा पोहून बाहेर आला. बुडालेल्याचा मृतदेह काल संध्याकाळी उशीरापर्यंत सापडला नव्हता. कुंडई येथे मानशीवर काम करण्यासाठी नेवरा येथील उमेश शिवराम नाईक (३४) व सुरेश नाईक (३६) होडीतून चालले असता खवळलेल्या जुवारी नदीत आलेल्या मोठ्या लाटेत ती उलटली. त्यामुळे दोघेही पाण्यात फेकले गेले. त्यातील सुरेश नाईक कसाबसा पाण्याबाहेर आला मात्र उमेश नाईक बुडाला.