Home बातम्या निवडणूक काळात बनावट नोटांची भीती

निवडणूक काळात बनावट नोटांची भीती

0

आरोग्य खात्यातील नोकरभरती प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी चौकशी अहवाल निवडणूक अधिकार्‍यांना सादर केला. सदर अहवाल मुख्य सचिवांना पाठवून देणार असल्याचे नावती यांनी सांगितले. वरील खात्यात परवा अनेक उमेदवार स्वीकृतीपत्रे घेऊन गेले होते. हे वृत्त निवडणूक अधिकार्‍यांना मिळताच त्यांनी छापा मारून सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली होती. या प्रकारामुळे प्रचंड खळबळ निर्माण झाली होती.

दरम्यान, तीन खात्यांनी नोकरभरती प्रकरणी दिलेला अहवाल समाधानकारक नाही. खाते प्रमुखांनी दिलेली माहिती व निवडणूक अधिकार्‍यांकडे असलेली माहिती यात तफावत असल्याचे दिसून आल्याने खाते प्रमुखांकडे खुलासा मागितल्याचे त्यांनी सांगितले.

२ जानेवारी पासून युवा मतदारांची नोंदणी सुरू केली असून दि. १२ जानेवारीपर्यंत १५ हजार युवा मतदारांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. या कामासाठी प्रत्येक विद्यालयात सुकाणू अधिकारी नियुक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काल गोवा लिकर ट्रेडर्स असोसिएशनने निवडणूक आचारसंहितेच्या नावाखाली अबकारी खात्याची निरीक्षक भ्रमण फातर्पेकर सतावणूक करीत असल्याची तक्रार निवडणूक अधिकार्‍यांकडे केली आहे. वरील तक्रार निवडणूक आयोगाला पाठवून दिल्याचे त्यांनी सांगितले.