दोन्ही हल्लेखोरांचा खात्मा
ट्यूनीशियाच्या संसदेजवळील बार्दो म्युझियममध्ये दोन अज्ञात बंदूकधारी दहशतवाद्यांनी हल्ला चढवून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात सतरा विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. दरम्यान, सलग तीन तास चाललेल्या लष्करी कारवाईत दोन्ही हल्लेखोरांचा खात्मा करण्यात आला.मृतांमध्ये ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, जर्मनी व ट्युनिशियाच्या नागरिकांचा समावेश आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच संसदेचे कामकाज बंद करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार ट्यूनीशियाची राजधानी ट्यूनिशमध्ये बार्दो म्युझियमवर अज्ञात हल्लेखोरांनी प्रवेश करत गोळीबार करत नागरिकांना लक्ष्य केले.अनेक लोकांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले आहे. आर्मीच्या वेशभूषेत दोन दहशतवादी म्युझियममध्ये घुसले. त्यावेळी म्युझियममध्ये शेकडो पर्यटक उपस्थित होते. म्युझियममध्ये हल्ला करणारे दोन्ही दहशतवादी इस्लामिक संघटनेचे आहेत. दोघेही अजून म्युझियममध्येच असून सुरक्षा जवानांनी त्यांना घेरले असल्याची माहिती ट्यूनीशियाच्या गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. संसदेत दहशतवादविरोधी कायद्यावर चर्चा सुरू असतानाच हा हल्ला झाल्याचे गृह मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद अली अरोरी यांनी सांगितले.