२००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार लष्कर ए तोयबाचा कमांडर झाकी उर रहमान लख्वी याच्यावर कारवाई करण्यासाठी अमेरिकेने सबळ पुरावे पाकिस्तानला सादर केल्याची माहिती अमेरिकेतील एका वरिष्ठ अधिकार्यांनी दिली आहे. मात्र, त्यांनी नेमके कोणते पुरावे दिलेत हे सांगण्यास नकार दिला आहे. यापूर्वी अमेरिकेने लख्वी याला शिक्षा झालीच पाहिजे असा दम पाकिस्तानला भरला होता. यानंतर आता अमेरिकेने त्याला शिक्षा व्हावी म्हणून प्रत्यक्ष पाठपुरावा सुरू केला आहे. सध्या लख्वी पाकिस्तानात तुरुंगात आहे.