अंजली दमानिया ‘आप’ बाहेर

0
94

अरविंद केजरीवाल यांनी गेल्या वर्षी सरकार स्थापनेसाठी कॉंग्रेसचे आमदार फोडण्याचे प्रयत्न केल्याच्या आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर काल अंजली दमानिया यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे आम आदमी पक्षाच्या अडचणीत भर पडली आहे. केजरीवाल यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणार्‍या दमानिया यांनी गेल्या वर्षी नागपूरमधून नितीन गडकरी यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. आपण असे प्रकार खपवून घेण्यासाठी पक्षात आले नव्हते. अरविंद केजरीवालांच्या तत्त्वांना आपला पाठिंबा दिला होता, सत्तेसाठी काहीही करण्यासाठी नव्हे, अशी प्रतिक्रिया दमानिया यांनी व्यक्त केली आहे.