केंद्रातील भाजप सरकारने मांडलेल्या भूसंपादन विधेयकाला काल विरोधकांनी कडाडून विरोध केला. हे विधेयक शेतकरी विरोधी असून ते संमत केल्यास देशाच्या अन्न सुरक्षेला धोका निर्माण होणार असल्याच्या दावाही विरोधिकांनी केला.कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, बिजू जनता दल, अभाअद्रमुक अशा प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी या वादग्रस्त विधेयकाचा खरपूस समाचार घेतला. कॉंग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी हे विधेयक सध्याच्या स्वरुपात संमत केल्यास शेतकर्यांच्या बहुपीक घेणार्या जमिनी खाजगी कंपन्यांच्या घशात जाणार असल्याची भीती व्यक्त केली. त्याचबरोबर यामुळे देशाच्या अन्न सुरक्षेला धोका निर्माण होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
‘या विधेयकाद्वारे देशाला अन्न धान्याची आयात करणारा देश बनविण्याचा सरकारचा हेतू आहे काय’ असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. हे विधेयक संमत झाल्यास या देशातील शेतकरी या देशापासून अपेक्षा बाळगणे सोडून देतील असे ते म्हणाले.
तृणमूल कॉंग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी केंद्र सरकार शेतकर्यांचे हक्क हिरावून घेऊ पाहत असल्याचा आरोप केला.