राज्यात सरकारकडून मांसाची टंचाई : कॉंग्रेस

0
104

भाजप सरकारला राज्यातील गुरांच्या मांसाची विक्री पूर्णपणे बंद झालेली हवी आहे. त्यामुळेच कटकारस्थान करून सरकारने राज्यात मांसाची टंचाई निर्माण केल्याचा आरोप कॉंग्रेस नेते तथा कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी काल पत्रकार परिषदेत केला. गोवा मांस प्रकल्पाच्या अध्यक्षांनी प्रकल्पातर्फे ‘बीफ’ची केंद्रे उघडण्याचे जाहीर केले आहे. त्यावर कुणीही विश्‍वास ठेवू शकणार नाही. यापूर्वी सरकारने स्वस्त दरात मांसळी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले होते, त्याचे काय झाले, असा प्रश्‍न फर्नांडिस यांनी केला. गोरक्षा मंच या बिगर सरकारी संस्थेच्या मदतीने सर्व काही केले जात आहे, असे त्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर या समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी प्रकरण न्यायालयात जाण्यापूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. हे तेवढेच महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले. राज्यात गुरांच्या मांसाची टंचाई झाल्याने चिकन, मटन व डुकराच्या मांसाचे भाव वाढले आहेत.
मोन्सेर्रात यांच्यावर कोणत्याही क्षणी कारवाई शक्य
पक्षाच्या विरोधात जाणार्‍यांवर कारवाई करण्याच्या बाबतीत कॉंग्रेसने कोणतीही तडजोड न करण्याचे ठरविले आहे. सांताक्रुझचे आमदार बाबुश मोन्सेर्रात यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय कोणत्याहीक्षणी होऊ शकेल, असे कॉंग्रेस प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी सांगितले.