मुफ्ती मोहंमद सईद १२ वे मुख्यमंत्री
जम्मू-काश्मीरला अखेर पीडीपी आणि भाजपचे संयुक्त सरकार सत्तेवर आले असून काल राज्याचे १२ वे मुख्यमंत्री म्हणून मुफ्ती मोहम्मद सईद यांनी, तर भाजप नेते डॉ. निर्मल सिंह यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी गोपनीयतेची शपथ दिली. जम्मू-काश्मीरच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजप सत्तेत सहभागी होत आहे.सईद २५ सदस्यांच्या मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतील. त्यात उपमुख्यमंत्रिपदासह १२ भाजपचे आणि उर्वरित १२ पीडीपीचे मंत्री असतील. मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांच्यासह पीडीपीचे मंत्री म्हणून एबी रेहमान वेरी, जावेद मुस्तङ्गा मीर, एबी हक खान, सय्यद बशरत बुखारी, चौधरी जुल्ङ्गीकार अली, डॉ. हसीब द्राबू, गुलाम नबी लोण, मोहम्मद अल्ताङ्ग बुखारी, इम्रान अन्सारी, नईम अक्तर, एबी मजीद पद्दार, मोहम्मद अश्रङ्ग मीर आणि आसिया नकाश यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
भाजपचे डॉ. निर्मल सिंह (उपमुख्यमंत्री), चंदर प्रकाश, लाल सिंह, बाली भगत, सुखनंदन कुमार, सज्जाद गनी लोण, शिलिंग दोर्जे, सुनील कुमार शर्मा, एबी गनी कोहली, प्रिया सेठी व पवन कुमार गुप्ता यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.
या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आदी ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान
मुफ्ती मोहंमद सईद यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पाकिस्तानवर स्तुतिसुमने उधळून सत्तेत संयुक्त पक्ष असलेल्या भाजपला चपराक दिली. ‘‘जम्मू-काश्मिरात नोव्हेंबर-डिसेंबर २०१४ मध्ये शांततेत पार पडलेली विधानसभा निवडणूक शेजारी राष्ट्र पाकिस्तान, हुरियत कॉंन्ङ्गरन्स आणि आतंकवादी संघटनांच्या सहकार्यामुळेच मोकळ्या वातावरणात झाली’’ असे सईद पत्रकारांशी बोलताना म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने देशभरात खळबळ माजली आहे.