Home बातम्या पिंडविसर्जनासाठी गेलेले पिता-पुत्र बुडाले

पिंडविसर्जनासाठी गेलेले पिता-पुत्र बुडाले

0

बोर्डा मडगाव येथे राहणार्‍या शिरवईकर कुटुंबात काल प्रसाद दामोदर शिरवईकर यांच्या दिवंगत वडिलांची काल वार्षिक श्राद्ध तिथी होती. दुपारी पिंडदान केल्यानंतर सायंकाळी पिंड विसर्जन करण्यासाठी राशोल-राय जेटीजवळ गेले होते. पिंड विसर्जन करण्यासाठी नदीत उतरत असताना प्रसाद पाय घसरून पाण्यात पडले. त्यांना वाचविण्यासाठी पूत्र दामोदर पाण्यात उतरला असता दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.

जेटीजवळ असलेल्या लोकांनी आरडाओरड केली व मायणा कुडतरी पोलिसांना वृत्त देताच अग्निशामक दल, मायणा कुडतरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक सिद्धांत शिरोडकर पोलीस पथकासह घटनास्थळी रवाना झाले व शोधाशोध सुरू केली. त्यानंतर पाणबुड्यांनाही पाचारण करण्यात आले. सर्वत्र पाण्यात शोध घेऊनही मृतदेह सापडले नव्हते. रात्रौ उशिरापर्यंत शोधाशोध चालू होती.

शिरवईकर कुटुंबातील वडील व पूत्र कर्तेसवर्ते होते. त्यांच्या मागे प्रसादची पत्नी व मुलगी आहे. पोलीस अधीक्षक अरविंद गावस, उपअधीक्षक उमेश गावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास कामात मार्गदर्शन केले.