पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे भाजप उमेदवार सिद्धार्थ कुंकळकर आज दि. २४ रोजी सकाळी आपला उमेदवारी अर्ज भरतील. यावेळी त्यांच्याबरोबर केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा व प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर उपस्थित राहतील.