अपघातात वृद्ध ठार

0
97

कुंकळ्ळी पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर झालेल्या स्कूटर अपघातात मार्टिन कुतिनो (८०) वृद्ध चालक ठार झाला तर सुदेश वेळीप जखमी झाला. ही घटना सकाळी ८.३० वाजता घडली. सकाळी सुदेश वेळीप (२७) सुवदळे पाडी येथून मडगावच्या दिशेने येत असता दोन्ही स्कूटरची एकमेकांना ठोकर बसली व कुतिन्हो गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काल इस्पितळात नेले. पण तेथे निधन झाले. कुंकळ्ळी पोलीस तपास करीत आहेत.