फातोर्डा येथील एका बहुमजली इमारतीच्या दुसर्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहणार्या चंगमला झिनीक सावियो फर्नांडिस (३०) या विवाहित महिलेचा, त्याच घरात राहणार्या घरगड्याने बेसबॉल बॅटने डोक्यावर प्रहार करून खून केला. मयत महिला व घरगडी दोघेही मणिपूर येथील असून पोलिसांनी घरगडी बॅनर स्टेफन किसिंग (२४) याला अटक केली आहे. ही घटना काल दुपारी १२.३० वाजता घडली.फातोर्डा स्टेडियमनजीक जे. जे. कॉश्ता हॉस्पिटलजवळील बहुमजली इमारतीत सावियो फर्नांडिस याने फ्लॅट विकत घेतला असून तो बोटीवर नोकरी करतो. त्याचा विवाह गेल्यावर्षी मूळ मणिपूर येथील चंगमला झिनीक हिच्याशी झाला असून तिला चार महिन्यांचे मूल आहे. तिचे सासर नावेली येथे असून ती सर्वजण नावेली येथे राहतात तर मयत चंगमला फातोर्डा येथे राहते. मुलाची देखभाल व घरकामासाठी चार महिन्यामागे मणिपूर येतील बॅनर किसींग याला ठेवले होते. काल दुपारी त्यांच्यात भांडण झाले. त्यात बॅटने प्रहार करून चंगमला हिचा खून केला. त्यानंतर जमीनवर पडलेले रक्त पुसून टाकले व तिचा मृतदेह झाकला. दुपारी तीन वाजता त्याच इमारतीत राहणार्या फेग्रेटचेन पेरैरा हिला त्याने चंगमलचा खून केल्याचे सांगितले. ती शेजारी मूळ मणिपूर येथील असून पेरैरा यांच्याकडे विवाह झाला आहे. तिने तात्काळ मडगाव पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी बॅनरला त्वरित अटक करून बॅट हस्तगत केली असून मृतदेह हॉस्पिसियुत ठेवला आहे. तिचा पती बोटीवर असून त्याच्याशी संपर्क साधला आहे. पोलीस नेमके कारण शोधत आहेत.