‘वॉट्‌सऍप’ आता डेस्कटॉपवर

0
125

मेसेजिंग, चॅटिंग ऍप्लिकेशनमध्ये लोकप्रिय असलेल्या वॉट्‌सऍपने ‘वॉट्‌सऍप वेब’ची घोषणा केली असून आता मोबाईलशिवाय हे ऍप्लिकेशन डेस्कटॉपवर वापरता येणार आहे. या वेबची ब्लॉगवरून घोषणा करताना आपल्यापैकी लाखो लोकांना पहिल्यांदाच आपल्या वेब ब्राउजरवरून वॉट्‌सऍप वारता येणार असल्याचे म्हटले आहे. अँड्रॉइड, ब्लॅकबेरी, नोकिया एस ६० आणि विडोंज फोनवर ही सेवा उपलब्ध आहे. फेसबुकच्या मालकीचे असलेले हे ऍप्लिकेशन जगभरात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले आहे. सुमारे ७० कोटी लोक हे ऍप्लिकेशन वापरत आहेत.