कोकण रेल्वेने आठवड्याच्या शेवटी आलेल्या सुट्यांनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर पुणे-मडगाव-पुणे ही विशेष रेल्वे धावणार असल्याचे जाहीर केले आहे. ०१४०९ क्रमांकाची पुणे-मडगाव ही गाडी आज दि. २३ रोजी पुण्याहून दुपारी २.४५ वाजता सुटणार आहे. तर, दुसर्या दिवशी सकाळी ६ वाजता ही गाडे मडगावला पोहचेल. ०१४१० क्रमांकाची गाडी मडगावहून सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी सुटेल व पुण्याला त्याच दिवशी रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी पोहचेल. या विशेष रेल्वेला १५ डबे जोडण्यात आले आहेत. लोणावळा, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिवी आणि करमली स्थानकांवर ही गोडी थांबणार आहे. कोकण रेल्वे व मध्य रेल्वेच्या संयुक्त प्रयत्नांतून ही गाडी धावणार असल्याचे कोकण रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.