मनमोहन सिंग यांची कोळसा घोटाळा प्रकरणी चौकशी

0
69

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची कोळसा घोटाळा प्रकरणी चौकशी झाली असल्याचे वृत्त आहे. कोळसा घोटाळा प्रकरणी मनमोहन सिंग यांची दोन दिवसांपूर्वी सीबीआयकडून चौकशी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यूपीए सरकारच्या कार्यकाळात मनमोहन सिंग पंतप्रधानपदी असताना सरकारमधील काही मंत्र्यांना कोळसा घोटाळा प्रकरणी राजीनामा द्यावा लागला होता.