Home बातम्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी वसंत आबाजी डहाके

साहित्य संमेलनाध्यक्षपदी वसंत आबाजी डहाके

0

चंद्रपूरला फेब्रुवारीमध्ये होणा-या ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी, समीक्षक वसंत आबाजी डहाके यांची निवड झाली. प्रतिमा इंगोले आणि जवाहर मुथा यांचा पराभव करून डहाके संमेलनाध्यक्ष झाल्याचे, साहित्य महामंडळाने शुक्रवारी जाहीर केले. ३८ वर्षांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चंद्रपूरला ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.