त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केले गेल्याची माहिती हवाई दलाचे प्रवक्ते विंग कमांडर गेरार्ड गॅल्वे यांनी दिली. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून भारतीय हवाई दलाचे एक पथक दुर्घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. तांत्रिक कारणामुळे उड्डाणानंतर त्याचा जमिनीवरील तळाशी संपर्क तुटला असावा असा कयास त्यांनी व्यक्त केला.
हवाई दलाच्या सुखोई विमानांची ही तिसरी दुर्घटना आहे. १९९७ साली हवाई दलात सामील करून घेतलेली ही अद्ययावत लढाऊ विमाने भारतीय हवाई दलाची शान मानली जातात. सन २००९ मध्ये दोन सुखोई ३० विमाने जैसलमेरजवळ दुर्घटनाग्रस्त झाली होती. पहिल्या दुर्घटनेतील दोन्ही वैमानिकांनी सुरक्षितरीत्या बाहेर उडी घेतली होती, परंतु त्यापैकी एक सहवैमानिक विंग कमांडर पी. एस. नाराह यांच्यावर दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष आदळून ते ठार झाले होते. दुसर्या दुर्घटनेत मात्र दोन्ही वैमानिक बाहेर उडी घेतल्याने बचावले होते. सुखोईची २० स्कॉड्रन ‘लाईटनिंग’ व ३० स्कॉड्रन ‘र्हायनोज्’ पुण्यात असून २४ स्क्वॉड्रन ‘हॉक्स’ उत्तर प्रदेशमधील बरेली येथे आहे.