![28mand.jpg28](https://navprabha.com/wp-content/uploads/2014/12/28mand.jpg28.jpg)
हस्तकला महामंडळाला ८० लाखांचा निधी
देशी तसेच विदेशी लोकांना आकर्षित करणार्या वस्तू कारागिरांनी तयार केल्यास पारंपरिक व्यवसायातून मुबलक प्रमाणात अर्थप्राप्ती होऊ शकेल, असे सांगून या व्यवसायाला चालना देण्यासाठी व पारंपरिक वस्तूंना बाजारपेठा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न असतील असे उद्योगमंत्री महादेव नाईक यांनी सांगितले.गोवा हस्तकला विकास महामंडळाने नेवगीनगर येथे उभारलेल्या अपरान्त मांडचे उद्घाटन केल्यानंतर नाईक बोलत होते. उद्योग खात्याने महामंडळासाठी ८० लाख रुपये मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली. ५० वर्षे पूर्ण केलेल्या पारंपरिक व्यवसायिकांसाठी सरकारने महत्वाची योजना राबविली आहे. त्यांना दरमहा एक हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल, त्यासाठी अनेक अर्ज आल्याची माहिती नाईक यांनी दिली. महामंडळाचे अध्यक्ष लवू मामलेदार यांनी पारंपरिक व्यवसाय करणार्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूनेच वरील उपक्रम करीत असल्याचे सांगितले. महामंडळाने जानेवारी महिन्यात मोले, उसगाव व शिरोडा येथे मांड उभारण्याचे ठरविले आहे.