मुंबई-गोवा विशेष पर्यटक रेल्वे गाडीसाठीच्या समझोता करारावर काल भारतीय रेल्वे व गोवा पर्यटन विकास महामंडळाने स्वाक्षर्या केल्या. येत्या ३० रोजीपासून रेलगाडी सुरू होणार आहे. आठवड्यातून ३ वेळा मुंबईहून पर्यटकांना घेऊन सदर रेलगाडी गोव्यात येणार असून महिनाभराच्या काळानंतर दररोज फेर्या मारणार आहे. या विशेष रेलगाडीमुळे गोव्यात पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांची चांगली सोय होणार असल्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी सांगितले. समझोता करारावर भारतीय रेल्वेच्या वतीने वीरेंद्रर सिंग व गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई यांनी सह्या केल्या. यावेळी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन नीलेश काब्राल उपस्थित होते.