खाण खात्याचे काल पांडुरंग तिंबलो व सेझा गोवा कंपनी यांच्या मिळून दोन लिजांवर सह्या केल्या असून आतापर्यंत सरकारने एकूण ११ लिजे मंजूर केली आहेत. लिजे मंजूर केली असली तरी संबंधित कंपन्यांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे दाखले सादर केल्याशिवाय प्रत्यक्ष खाण व्यवसाय सुरू करता येणार नाही. वरील मंत्रालयाच्या पर्यावरणीय दाखल्यांच्या प्रक्रियेसाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे प्रत्यक्ष खाण व्यवसाय २०१५ मध्येच सुरू होऊ शकेल, असे या क्षेत्रातील लोकांचे म्हणणे आहे. लिजे मंजूर झाली असली तरी प्रत्यक्ष खनिज उत्खनन कधी सुरू करावे हे खाण कंपन्यांवरच अवलंबून आहे. खाण कायद्यातील नवी नियमावली व सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्त्वे यामुळे खाण कंपन्यांना काळजी घेऊन व्यवसाय सुरू करावा लागेल.