पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीच्या उमेदवाराची ९४ जणांची समिती बैठक घेऊन निवड करणार असल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.पर्रीकर याना संरक्षणमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत नेले तरी ते गोव्याच्या राजकारणावर नजर ठेवून आहेत.मुख्यमंत्री झाल्यानंतर लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही त्यांना किमान दोन महिने आपल्याला काही विषयांच्या बाबतीत सहकार्य व मार्गदर्शनाची जबाबदारी पर्रीकर यांना दिली आहे.