Home बातम्या पंचायतींच्या सूचना विचारात घेऊन पुढील पावले

पंचायतींच्या सूचना विचारात घेऊन पुढील पावले

0

यासंबंधी पुढे माहिती देताना ते म्हणाले की, संपूर्ण गोवाभरातून आराखड्यात दुरुस्त्या सूचवणारे २३०० अर्ज आले आहेत. आता दुरुस्त्या सूचवण्यासाठी २० डिसेंबरपर्यंतची मुदत वाढवून देण्यात आली असल्याचे ते म्हणाले. आराखड्यात दुरुस्त्या सूचवणारे जे २३०० अर्ज आलेले आहेत त्यापैकी ९९ टक्के लोकांना आराखड्यात निवासी विभाग वाढवून हवे आहेत असा आरोप पुत्तुराजू यांनी केला. मात्र, तसे केल्यास या आराखड्याला काहीही अर्थ राहणार नसल्याचे ते म्हणाले. मात्र, तसे असले तरी सर्वांचे म्हणणे ऐकून घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

गावा गावात दाखवण्यात आलेले १५ मीटर रुंदीचे रस्ते हे त्या त्या गावातील लोकांसाठीच असून आपणाला ते हवेत की नकोत याचा निर्णय त्या त्या गावातील लोकांना घ्यावा लागणार असल्याचे ते म्हणाले.

किनार्‍यांवर आता वादळे व अन्य नैसर्गिक आपत्त्या येऊ लागलेल्या असून या पार्श्‍वभूमीवर किनार्‍यावर नैसर्गिक आपत्ती विभाग स्थापन करण्यात येणार असून २० हजार चौ. मी. जागेत ते उभे राहणार असल्याचे पुत्तुराजू यांनी सांगितले. किनार्‍यांवर जाण्यासाठी रुंद रस्ते व पार्किंगचीही सोय करण्यात येणार असल्याचे सांगून त्यावर आराखड्यात भर देण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

आराखड्यातील छोटे उद्योग विभाग हे स्थानिकांसाठी फायद्याचे ठरतील, असे ते म्हणाले.