बेकायदा गुरे कत्तल प्रकरणी तिघांविरुद्ध तक्रार नोंद

0
84

बेकायदेशीरपणे गुरांना बांधून कत्तल करीत असल्याच्या तक्रारीवरुन सांतीमळ राय येथील सैफुद्दिन बेपारी, फरूक बेपारी व इतर तिघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. मायणा-कुडतरी पोलीस स्टेशनवर तक्रार देताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. पोलिसांना तेथे तीन बैल व वासरू बांधलेले सापडले. शिवाय तेथे जनावरांच्या रक्ताचे डाग दिसून आले.