हवाई दल प्रमुखांकडून चिंता व्यक्त
एका बाजूने चीनचे अस्तित्व वाढत आहे तर दुसर्या बाजूने पाकिस्तान चिथावणीखोरवृत्तीने वागत आहे, अशा स्थितीत येणार्या काळात भारतासमोर गंभीर संरक्षणात्मक आव्हाने असून त्यादृष्टीने तयारी करावी लागणार असल्याचे, हवाई दलप्रमुख ऍडमिरल अरूप राहा म्हणाले.शेजारील राष्ट्रांकडे गमवावे लागलेले आपले भू-प्रदेश पुन्हा मिळविण्याचे सोडून भारताच्या अन्य महत्त्वाकांक्षा नाहीत, असे सूचित करताना, बचावात्मक पवित्रा म्हणून भारताला युद्धाच्या तयारीनेच राहावे लागणार असल्याचे ते म्हणाले. बेंगलोर येथे एका व्याख्यानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.