जम्मू काश्मीरातील विक्रमी मतदान म्हणजे लोकांनी ‘बॅलट’(मतां)द्वारे दहशतवाद्यांच्या ‘बुलेट’(गोळ्या)ना दिलेले उत्तर आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल प्रचारसंभांना संबोधित करताना सांगितले. हा लोकशाहीचा विजय असल्याचे ते म्हणाले. गोळ्या आणि बॉम्ब वापरूनही राज्यात लोकशाही जीवंत असल्याचे पाहुन दहशतवादी वैफल्यग्रस्त बनल्याचे मोदी म्हणाले. भाजपला एक संधी द्या, आम्ही विकास काय असतो, ते दाखवू असे ते शेवटी म्हणाले.