केरळच्या दोघांना संतपद बहाल

0
89

फादर कुरीयाकोस ऊर्फ छावरा आणि सिस्टर युफ्रेसिया इलुवेंथीकल या दोघांना पोप फ्रांसिस यांनी संतपद बहालीची घोषणा केली. हे दोघेही केरळशी संबंधित आहेत. सायरो मलबार कॅथलिक चर्चशी संबंधित आता तीन संत झाले असून, २००८मध्ये सिस्टर आल्फोन्सा यांना संतपद बहाल करण्यात आले होते. व्हॅटिकन येथे सेंट पिटर स्क्वेअर येथे विशेष प्रार्थनासभेत पोपनी त्यांच्या नावांची घोषणा केली. सायरो मलबार चर्चची परंपरा इ.स. पहिल्या शतकापर्यंत मागे जाते. या शतकात सेंट थॉमस यांच्या येथील आगमनानंतर ती सुरू होते. फादर छावरा व सिस्टर युफ्रेशिया या कोट्टायम, एर्नाकुलम आणि त्रिशूर या केरळमधील स्थळांशी संबंधित आहे. फा. छावरा (१८०५-१८७१) हे समाजसुधारक गणले जातात. त्या काळात संस्कृत संस्था त्यांनी स्थापन केली होती.