भोबे असोसिएटस् गोव्यातही काळ्या यादीत जाणार?

0
160

नवीन कामे न देण्याचा विचार
राज्यातील बहुतेक विकास प्रकल्पांसाठी सल्लागार म्हणून काम करणार्‍या एस. एन. भोबे असोसिएटस् या कंपनीला गोवा पायाभूत सुविधा विकास महामंडळाने नवीन कामे न देण्याचा विचार केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. वरील कंपनीने केलेल्या कामांचीही अन्य कंपनीकडून तपासणी करण्याची तयारी जीएसआयडीसीने ठेवल्याचे कळते.गुजरात राज्यातील उड्डाणपूल कोसळल्यानंतर तेथील सरकारने वरील कंपनीला काळ्या यादीत टाकले होते. त्यामुळे गोव्यातील पुलांच्या कामाच्याबाबतीत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. गोवा सरकार या कंपनीचे काय करणार, असा प्रश्‍न सांबांखामंत्री सुदिन ढवळीकर यांना त्यावेळी विचारला असता एस. एन. भोबे असोसिएट ही कंपनी सल्लागार संस्था म्हणून काम करते. प्रत्यक्ष बांधकाम करीत नाही. बांधकामांवर अन्य अभियंत्यांचे लक्ष असते. त्यामुळे चिंतेचे कारण नाही, असे त्यांनी सांगितले होते.