बाल स्वच्छता मीशन, ‘उडान’चा शुभारंभ

0
102

बालदिना निमित्त केंद्र सरकारतर्फे बाल स्वच्छता मीशनचा तसेच मुलींना आयआयटी-जेईईसाठी तयार करणार्‍या ‘उडान’ योजनेचा शुभारंभ कालपासून करण्यात आला. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी दिल्लीत राष्ट्रीय बालभवनात बाल स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेचा हा एक भाग असेल. याअंतर्गत शाळेत स्वच्छ आहार, स्वच्छ परिसर, स्वच्छ पाणी, स्वच्छ शौचालये, असे उद्दीष्ट ठेवले आहे. दरम्यान, अकरावी व बारावीत शिकणार्‍या ज्या मुलींना अभियांत्रिकी शिक्षण घ्यायचे आहे त्यांची आयआयटी-जेईई परीक्षेसाठी तयारी करून घेणार्‍या ‘उडान’ योजनेचाही शुभारंभ करण्यात आला. यंदा देशभरातून ९४६ मुलींची या योजनेसाठी निवड केली आहे. या योजने अंतर्गत निवड होणार्‍या मुलींच्या आयआयटी व एनआटी संस्थांत खर्चाचा भार केंद्र सरकार उचलेल.