आज दुपारी मंत्रिमंडळ विस्तार

0
86

मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज दुपारी ३.३० वाजता काबो राजभवनवर होणार असून नावेलीचे अपक्ष आमदार आवेर्तान फुर्तादो व गोवा विकास पार्टीचे आमदार मिकी पाशेको यांना राज्यपाल मृदूला सिन्हा पद व गोपनीयतेची शपथ देतील. दरम्यान, पार्सेकर यांनी सर्व मंत्र्यांना किरकोळ बदल करून पूर्वीचीच खाती देण्याचे ठरविल्याचे कळते. आज संध्याकाळपर्यंत खात्याचे अधिकृतपणे वाटप होण्याची शक्यता आहे.