महापौरांचे संरक्षणमंत्र्यांना पत्र
पणजी शहरात मध्यभागी दोन ठिकाणी लष्कराच्या ताब्यात असलेली जमीन ही मूळ पणजी महापालिकेची असून ती जमीन पूर्ववत पणजी महापालिकेच्या स्वाधीन केली जावी अशी सूचना संरक्षण मंत्रालयातर्फे येथील लष्करी अधिकार्यांना संरक्षणमंत्री या नात्याने मनोहर पर्रीकर यांनी करावी अशी मागणी पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी काल मनोहर पर्रीकर यांच्याकडे एका लेखी पत्राद्वारे केली आहे.एका ठिकाणची जमीन ही १४४३ चौ. मी. तर दुसर्या ठिकाणची जमीन ही ३५२६ चौ. मी. एवढी आहे. गोवा मुक्तीपूर्वी ही जमीन तेव्हाची पालिका म्हणजेच कामरा म्युनिसिपल-द-गोवा यांच्या मालकीची होती. मुक्तीनंतर कामरा म्युनिसिपल पणजी नगरपालिका बनली तर नंतर ती महापालिका बनली. २ सिग्नल ट्रेनिंग सेंटरच्या मुख्यालयाजवळ त्यांच्या वाहनांसाठी जी जमीन वापरण्यात येत आहे त्या जमिनीचा खरे म्हणजे त्यांना उपयोग नाही. कारण तेथे म्हणावी एवढी वाहनेच नसतात.
माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी लष्कराला बांबोळी येथे अतिरिक्त जमीन देताना या जमिनीवरील हक्क सोडण्याची अट घातली होती. मात्र लष्कराने अजून ती जमीन सोडली नसल्याचे फुर्तादो यांनी पत्रातून नजरेत आणून दिले आहे. वरील जमीन महापालिकेला परत मिळावी यासाठी संरक्षण मंत्र्यांना विनंती करण्याचा ठराव ३१ जुलै २०१३ रोजी झालेल्या महापालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता, असेही फुर्तादो यांनी
या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयातील अधिकार्यांशी बोलून या जमिनीचे हस्तांतरण होईल याकडे लक्ष देण्याची विनंती फुर्तादो यांनी पर्रीकर यांना केली आहे.