आज संपामुळे बँक सेवांवर परिणाम शक्य

0
95

पगाराचा फेरआढावा घेण्याच्या मागणीसाठी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका आज एका दिवसाच्या संपावर जात असून त्यामुळे धनादेश वटविण्यासारख्या सेवांवर परिणाम संभवतो. संपावर जाण्याचा निर्णय घेतलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉइज संघटनेत स्टेट बँकेसह २७ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा समावेश आहे.