शापोरा येथे अमली पदार्थ जप्त

0
79

गोवा पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाने मंगळवारी पहाटे शापोरा येथील क्लब कोलबासाजवळ छापा मारून मुस्तफा इक्बाल मियॉंजी (२९), ठाणे-महाराष्ट्र, मोहम्मद युसूफ दर्वेश (२९), मुंबई यांना रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून १०५ ग्राम एमफेटामीन हे अमली पदार्थ जप्त केले.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या अमली पदार्थांची किंमत १० लाख २५ हजार रु. एवढी असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून ६०० रु. रोख व जीए ०३ एन्. ३४८७ ही स्कुटरही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.