पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून म्यानमार, ऑस्ट्रेलिया आणि फिजी देशाच्या दौर्यावर जात आहेत. या दहा दिवस काळाच्या दौर्यादरम्यान ते १५ नोव्हेंबर रोजी ब्रिसबेन येथे दोन दिवसीय जी २० देशांच्या शिखर परिषदेतही सहभागी होतील.परिषदकाळात ते ऑस्टेलियाचे पंतप्रधान टोनी अबोट यांच्याशी विशेष चर्चा करणार आहेत. त्याआधी १२ व १३ रोजी ‘आसियान’ देशांच्या परिषदेत ते उपस्थित राहतील.