गोव्याच्या अग्नीशमन दलातील एक अधिकारी नितीन वासुदेव रायकर यांची उपसंचालकपदी नियुक्ती झाली आहे. राज्य सरकारने त्यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. गोवा लोकसेवा आयोगाने केलेल्या शिफारसीनंतर राज्य सरकारने हा आदेश जारी केला. साहाय्यक स्टेशन फायर ऑफिसर म्हणून १९९१ म्हणून रुजू झालेले रायकर यांना २०१० मध्ये साहाय्यक विभागीय अधिकारी म्हणून बढती देण्यात आली होती. या दरम्यानच्या काळात त्यांनी पणजी, वास्को, फोंडा, ओल्ड गोवा, म्हापसा व मडगाव यासारख्या अग्नीशमन दलाच्या विविध केंद्रात काम केले. त्यांची नियुक्ती हंगामी स्वरुपाची आहे. अग्नीशमन दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल २००८ साली रायकर मुख्यमंत्री अग्नीसेवा सुवर्णपदकाचे रायकर मानकरी ठरले होते.