Home बातम्या जुने गोवे येथे भीषण अपघातात

जुने गोवे येथे भीषण अपघातात

0

मृतांची नावे जोसेफ मोसांग (२३), आंध्रप्रदेश व प्रंकित हरन (२२), मालभाट – मडगाव अशी आहेत, तर जखमीचे नाव इनातियो सू (२२), नागालॅण्ड असे आहे.

वरील तिघेही शुक्रवारी रात्रौ जीए ०८ जे ६६१६ या स्कूटरवरून जात असताना पणजीहून भरधाव वेगात जुने गोवे येथे जाणार्‍या एपी २८ टीबी ६३६३ या बसने कदंब बायपासजवळ स्कूटरला धडक दिल्याने स्कूटरवरील तिघेहीजण कोसळले. पैकी जोजेफ मोसांग व प्रंकित हरन याना उपचारासाठी गोमेकॉत हलवताना वाटेतच त्यांचे निधन झाले, तर इनातियो सू याच्यावर गोमेकॉत उपचार चालू आहेत.

जुने गोवे पोलिसांना अपघाताची खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. बस ड्रायव्हर रमेशकुमार याला पोलिसांनी अटक केली आहे.