तिळारीच्या विस्थापित कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रु. :  मांद्रेकर

0
105

तिळारी धरणामुळे विस्थापित झालेल्या महाराष्ट्र हद्दीतील ९०० पेक्षा अधिक कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला असून तेथील जिल्हाधिकार्‍यांकडून प्रत्येक कुटुंबाची तपशिलवार माहिती आल्यानंतर ई-पद्धतीने मदत वितरित केली जाईल, अशी माहिती जलस्रोत मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी दिली.
गेल्या ऑगस्ट महिन्यात दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते. यापूर्वी प्रत्येकी ३ लाख रु. देण्याची तयारी ठेवली होती. दोन्ही राज्यांमध्ये झालेल्या वाटाघाटीनंतर वरील निर्णय घेण्यात आल्याचे मांद्रेकर यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील संबंधित जिल्हाधिकार्‍यांना कुटुंबांची अधिकृत यादी पाठविण्यास सांगितले आहे. वरील योजनेसाठी सरकारने ३८ कोटींची तरतूद केली आहे.