फोन केला म्हणून कवळेकर दोषी ठरत नाहीत : मांद्रेकर

0
101

किरण गोडबोले आत्महत्या
जलस्रोत खात्याचे सहाय्यक अभियंते किरण गोडबोले यांना भ्रमणध्वनीवर केप्याचे आमदार बाबू कवळेकर यांनी कॉल केल्याचे आढळून आले असले तरी त्यांना दोषी धरता येत नाही. कुणीही कुणालाही फोन करू शकतात, असे जलस्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.
गोडबोले आत्महत्या प्रकरणी चौकशी चालू आहे. चौकशीअंती सर्व काही स्पष्ट होऊ शकेल, असेही ते म्हणाले.
जलस्रोत विभागात सहाय्यक अभियंते असलेल्या गोडबोले यांनी घोगळ-मडगाव येथील कार्यालयात गळफास लावून आत्महत्या केली होती.