पेट्रोल ५५ पैसे स्वस्त; डिझेल बाबत आज निर्णय

0
78

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशात परतल्यानंतर पेट्रोल किमतीत प्रति लिटर ५५ पै. तर डिझेल किमतीत प्रति लिटर १ रुपया कपात केली जाणार असल्याचे कळते. तेल महामंडळाची दरांचा आढावा घेण्याची बैठक काल झाली मात्र नवे दर मोदी येईपर्यंत जाहीर न करण्याचे ठरले. डिझेल किमतीत गेल्या पाच वर्षांत कपात झालेली नाही. २०१३ साली अभ्यास समितीने शिफारस केली होती की डिझेलचे दर किंचित वाढवत जाऊन नुकसान भरून काढावे.