वापराविना ठेवलेल्यांचे भूखंड जीआयडीसी ताब्यात घेणार

0
104

महामंडळाकडून संबंधितांना नोटिसा
आमदार चंद्रकांत कवळेकर यांच्या कारकीर्दीत भूखंड खरेदी करून त्याचा औद्योगिक प्रकल्पासाठी वापर न केलेल्यांना गोवा औद्योगिक विकास महामंडळाने (जीआयडीसी) कारवाईसाठी नोटिसा बजावल्याने संबंधित भूखंडधारकांची तारांबळ उडाली आहे. अशा लोकांच्या ताब्यात असलेले भूखंड पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याचे महामंडळाने ठरविले आहे.
नियमानुसार भूखंड ताब्यात घेतल्यानंतर प्रकल्प उभारला पाहिजे. अनेकजणांनी वजन वापरून भूखंड खरेदी केले होते. घर बांधण्याच्या हेतूने काहीजण भूखंड खरेदी करतात. परंतु घर बांधणे लांबणीवर पडते. अशाच पध्दतीने वरील भूखंड विनावापर ठेवले होते. सरकारने अशा लोकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महामंडळाने संबंधितांवर वरील भूखंड पुन्हा ताब्यात घेण्याच्या हेतूने नोटिसा बजावल्या. अशा प्रकारचे सुमारे शंभर भूखंड असल्याचे सांगण्यात आले.
महामंडळाचे भूखंड निश्‍चित केलेल्या दरात खरेदी करताना ते मिळविण्यासाठी ‘वेगळा’ व्यवहारही करावा लागतो. त्याचे पुरावे उपलब्ध नसतात. त्यामुळे संबंधितांनी केलेला व्यवहार जाहीर करणेही शक्य होत नाही. महामंडळ कोणतीही कारवाई करू शकणार नाही, अशी भूखंड खरेदी केलेल्यांची भावना होती. वरील भूखंड पुन्हा ताब्यात घेण्याचे महामंडळाने ठरविले आहे.