कर्नाटकशी असलेल्या म्हादईसंबंधी वादाच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे शिष्टमंडळ कृष्णा पाणी वाटप लवादाच्या मलप्रभा नदीसबंधी कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीला गेले आहे. म्हादई पाणी वाटप लवादाने २ डिसेंबरपर्यंत गोवा,कर्नाटक,महाराष्ट्राला आपापल्या आक्षेपांसंबंधी पुरक माहिती देण्यास सांगितले आहे, त्यास अनुसरून गोव्याकडून हा अभ्यास केला जात आहे.