कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटले; तक्रार नोंद

0
78

बागा कळंगुट येथे बंगळूरहून आलेल्या व हॉटेलची वाट चुकलेल्या सहा पर्यटकांना अज्ञात चोरट्यांनी निर्जनस्थळी नेले. तेथे त्यांना धमकी देत मरहाण केली व त्यांच्याकडील रोकड, सोन्याचे दागिने व इतर वस्तू मिळून साडे तीन लाखांचा मुद्देमाल लुटल्याच्या आरोपावरून कळंगुट पोलिसांनी काल आठ अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. कळंगुट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना १४ जुलै रोजी संध्याकाळी ६.३० ते ७ च्या दरम्यान बागा येथे घडली होती. घटना घडल्यानंतर फिर्यादी ए. बालाजी सिंग व त्याचे इतर पाच मित्र तक्रार न करताच आपल्या घरी गेले होते. फिर्यादी ए. बालाजी सिंग याने ई-मेलच्या सहाय्याने कळंगुट पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात संशयितांविरुध्द गुन्हा नोंद केला आहे.