राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्षक्ष अजित सिंग यांना दिल्लीतील सरकारी बंगला सोडण्याची सूचना देऊन वीज-पाणी तोडल्याच्या निषेधार्थ काल रालोद पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मुरादनगर येथून दिल्लीला होणारा जलपुरवठा बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांशी झटापटीत १२ कार्यकर्ते जखमी झाले. शिवाय त्यांनी मेरठ-नवी दिल्ली हा गर्दीचा महामार्ग रोखून धरला. दरम्यान, अजित सिंग यांच्या बंगल्याचे रुपांतर चरण सिंग स्मारकात करावे, अशी नवी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे.