‘आयएसएल’ जिंकण्याचे ध्येय : झिको

0
106
एफसी गोवा संघाचे नवनियुक्त प्रशिक्षक प्रख्यात माजी ब्राझिलियन फुटबॉलपटू झिको बोलताना. सोबत संघाचे सहमालक श्रीनिवास धेंपो.

भारतीय फुटबॉलचा दर्जा वाढवण्याचा प्रयत्न करणार
गोवा एफसी फुटबॉल क्लबसाठी प्रशिक्षक म्हणून काम करण्याची मोठी जबाबदारी असल्याचे सांगताना, क्लब खेळणार असलेली इंडियन सुपर लीग स्पर्धा जिंकण्याचे ध्येय ठेवल्याचे प्रख्यात माजी ब्राझिलीयन फुटबॉलपटू झिको यांनी काल सांगितले.
एफसी गोवाचे सहमालक श्रीनिवास धेंपो यांनी काल झिको यांना पत्रकारांसमोर सादर केले. ही क्लबातर्फे गोव्यासाठी भेट असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, जपान, इराक, तुर्की, रशिया, कतार येथील फुटबॉल संघांना मार्गदर्शन केलेल्या झिको यांनी आपले विविध अनुभव सांगून भारतात फुटबॉलसाठीचे प्रेम पाहता त्या प्रमाणात खेळाचा दर्जा नसल्याचे झिको यांनी नमूद केले. आपण हा दर्जा व्यावसायिक पद्धतीचा व अव्वल बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे झिको म्हणाले.
आयएसएलमध्ये जगभरातील अनेक नावाजते खेळाडू खेळणार आहेत, त्याचा भारतीय तरुण फुटबॉल खेळाडूंवर सकारात्मक परिणाम होणार असल्याचे ते म्हणाले. आपण भारतातील फुटबॉल संस्कृती समजून घेण्याचा आधी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
झिको गोवा एफसी संघाच्या फुटबॉल खेळाडूंना गुरुवारपासून प्रशिक्षण देणार आहेत.