पणजीत पे पार्किंगची अंमलबजावणी लांबणीवर

0
86

 अभ्यासासाठी कृती समिती स्थापन
पणजी महापालिकेच्या काल झालेल्या बैठकीत शहरातील पे पार्किंग योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावी, याचा अभ्यास करण्यासाठी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे १९ पासून होणारी पे पार्किंगची अंमलबजावणी तूर्त लांबणीवर पडली आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही परवा टप्प्याटप्प्यानेच पे पार्किंग योजनेची अंमलबजावणी करण्याचे सांगितले होते. वरील समितीची पहिली बैठक येत्या मंगळवारी होणार असल्याचे सांगण्यात आले.
सरकारकडून मिळणार्‍या अनुदानाचा वापर करून केलेल्या कामाची माहिती सादर करणारी पत्रे सरकारला सादर न झाल्याने अनुदान मिळण्यास अडचण येते, या मुद्यावर बैठकीत महापौरांवर आरोप झाले. आरोप, प्रत्यारोपांमुळे बैठक वादळी झाली. त्यामुळे कामकाज काय चालू होते हे कळणेही कठीण झाले.