स्त्रीभ्रूण हत्या व घटत्या मुलींच्या प्रमाणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने काल चिंता व्यक्त केली. तसेच गर्भनिदान चाचणी रोखण्यासाठी व मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. बहुतेक राज्यांत मुलींचे प्रमाण घटत चालले असल्याकडे खंडपीठाने लक्ष वेधले. काय उपायोजना केल्या ते सांगताना त्यातून काय निष्पन्न झाले तेही सांगावे अशी सूचना न्या. दीपक मिश्रा व न्या. एन. व्ही. रामना यांच्या खंडपीठाने केली. एका बिगर सरकारी संस्थेतर्फे दाखल या याचिकेवर पुढील सुनावणी आता २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे.