जम्मू काश्मीरच्या विविध पूरग्रस्त भागांतून आतापर्यंत १ लाख ८४ हजार लोकांना वाचविण्याच आल्याचे राज्य सरकारकडून काल सांगण्यात आले. मदतकार्याचा काल १३ वा दिवस होता.
दरम्यान, राज्यात रोगराई पसरू नये यासाठी खास काळजी घेण्यात येत आहे. जलशुद्धीकरणाच्या १३ टन गोळ्या तसेच १.२ लाख पाण्याच्या बाटल्या शुद्ध करण्याची क्षमता असलेले सहा प्रकल्प राज्यात पोचले.
वीज पुरवठा कोलमडला असून फिरते जनरेटरही राज्यात पाठविण्यात आले आहेत. पूरग्रस्तांसाठी १३०० तंबू बांधण्यात आले आहेत.