कडक शिक्षेची तरतूद असलेला नवा मोटर वाहन कायद्याचा मसुदा काल जनतेच्या सूचनांसाठी खुला करण्यात आला. यात मद्यप्राशन करून वाहन चालवताना पहिल्या वेळेस सापडल्यास २५ हजार दंड व तीन महिने शिक्षा, दुसर्यांदा सापडल्यास ५० हजार दंड व एक वर्ष शिक्षा आणि त्यानंतर परवाना रद्द तसेच ३० दिवस वाहन ताब्यात अशी तरतूद आहे. अपघातात मूलाचा बळी गेल्यास सात वर्षे शिक्षा आदी अनेक तरतूदी करण्यात आल्या आहेत.