अमित शहांविरुद्धचे आरोपपत्र फेटाळले

0
78

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्धचे आरोपपत्र काल उत्तर प्रदेश पोलिसांनी फेटाळले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान द्वेष पसरवणारे भाषण केल्याबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांनी परवा बुधवारी हे आरोपपत्र दाखल केले होते.
आरोपपत्र फेटाळताना, उत्तर प्रदेश पोलिसांनी ते योग्य पद्धतीने सादर केले नसल्याचे ताशेरे कोर्टाने ओढले. एफआयआर दाखल झाल्यानंतर अटक करण्यात का टाळाटाळ झाली, असेही कोर्टाने विचारले. दरम्यान, राज्य प्रशासन कोर्टाच्या आदेशाचा अभ्यास करीत असून नव्याने आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. व्हिडियो क्लिपच्या आधारे मुझफ्फरनगर पोलिसांनी अमित शहांविरुद्ध ४ एप्रिलच्या भाषणासाठी गुन्हा नोंदवला होता.